👉चोरट्यास २ दिवस तर विल्हेवाट लावणाऱ्यांना १ दिवस पो. कोठडी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या दोन भंगार दुकान चालकांसह चौघांना पकडण्याची कारवाई ‘कोतवाली गुन्हे शोध विभागाच्या टिम’ने केली आहे. चोरटा अहमद मुन्ना शेख (रा मुकुंदनगर अहमदनगर ), शाहरुख आलम शेख (रा नागरदेवळे ता नगर जि अहमदनगर), भंगार विक्रेते दुकानदार अहमद मुन्ना शेख (रा मुकुंदनगर अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे असून, यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चोरट्यांना दोन दिवस तर विल्हेवाट लावणाऱ्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तन्वीर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना ए पी इनामदार, पोना योगेश खामकर, पोना बाळासाहेब मासळकर, पोकाॅ संदीप थोरात, पोकाँ अमोल गाढे, पोकाॅ सागर मिसाळ, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकाॅ सुजय हिवाळे, पोकाॅ कैलास शिरसाठ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील चोरीस गेलेली बुलेट दुचाकी ही अहमद मुन्ना शेख (रा मुकुंदनगर अहमदनगर) याने चोरी केली आहे. त्याने चोरी केल्यानंतर ती बुलेट ही त्याचा साथीदार शाहरुख आलम शेख (रा नागरदेवळे ता नगर जि अहमदनगर) याच्या राहत्या घरात लपवून ठेवली होती. त्यानंतर कोठेतरी घेऊन जाऊन ती खोलून त्या बुलेटचे सर्व वेगवेगळे स्पेअरपार्ट सुट्टे करुन भंगारच्या दुकानामध्ये विक्री करुन त्याची विल्हेवाट लावलेली आहे. मिळालेल्या पैशाची दारु पिऊन मौजमजा केलेली आहे. अशी माहिती मिळाल्याने अहमद मुन्ना शेख (रा मुकुंदनगर अहमदनगर), शाहरुख आलम शेख (रा नागरदेवळे ता नगर जि अहमदनगर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देत पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलिसांनी पोलिस खाक्या दाखविताच त्याने चौकशी बुलेट दुचाकी ही आम्ही चोरुन करुन नंतर तिचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार विक्रेते दुकानदार अहमद मुन्ना शेख (रा मुकुंदनगर अहमदनगर), शाहरुख आलम शेख (रा नागरदेवळे ता नगर जि अहमदनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या बुलेटचे वेगवेगळे सुट्टे स्पेअरपार्टस, इंजिन, चेसीज है। रिकव्हर केले. या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता,दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना दोन दिवस तर दुचाकी खोलून विल्हेवाट लावणाऱ्या भंगार दुकानदारांना एक दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोना बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. अटक आरोपींना अधिक विचारपूस सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.