संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : Ahemnagar Crime News शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापडाबाजारात व्यापा-याला झालेल्या मारहाणीप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी व्यापा-यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान दीपक रमेश नवलानी (रा.सावेडी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून पोलिस प्रशासनाने चौघाजणांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर चौघांपैकी दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
अमर हमीद शेख, रिजवान अमिन सय्यद (रा. पाचलिंबगल्ली कापड बाजार अहमदनगर) या दोघांना अटक केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलिसांनी दोघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपांचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर शहरातील एमजी रोड शहाजी चौक कापड बाजारात शुक्रवारी (दि.१४ एप्रिल) ३ ते ५.१५ वाजण्याच्या दरम्यान हमजा शौकतआली शेख याने त्याचे बांगडीचे दुकानाजवळ स्वतंत्र बॅरिकेटिंग केले होते, व तक्रारदार यांना दुकानात जाण्या- येण्याकरिता अडथळा येत असल्याने त्याला बॅरिकेटिंग (गेट) काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी व त्याचा धाकटा भाऊ यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी भांडण करायला जवळ कुलपाचे दुकान असलेला रिजवान अमीन सय्यद हा देखील आला. त्याने शिवीगाळ केली. ५.१५ वाजण्याच्या सुमारास सिद्धी किडस या दुकानासमोर मित्र प्रणील भोगावत हे गप्पा मारत उभे होते. यावेळी रिजवान अमिन सय्यद याचा जावई अमार हमिद शेख हा तेथे येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे असलेला धारदार शस्त्राने छातीवर आणि पोटावर चार ठिकाणी वार करून गंभीर दुखापत केली. साक्षीदार प्रवीण भोगावत याच्या सुद्धा हातावर वार केले आहेत. आरोपी अम्मार अमित शेख, रिजवान अमित सय्यद, हमजा शेख व त्याचा धाकटा भाऊ याच्या सांगण्यावरून दमदाटी करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने पोटावर मारून गंभीर दुखापत केली., या दीपक रमेश नवलानी (रा.सावेडी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून
अमर हमीद शेख, रिजवान अमिन सय्यद (रा. पाचलिंबगल्ली कापडबाजार अहमदनगर), हमजा शौकत आली शेख व त्याचा धाकटा भाऊ (रा. मोचीगल्ली अहमदनगर) या सर्वांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६९/२०२३ भादवी कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.