कोतवाली ठाणे : मोहरमच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल असणाऱ्या २२७ वर कारवाई

👉१३८ समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई
👉मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीसह मोठा पोलीस बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्याची ही राहणार नजर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी २२७ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये १३८ गुंडांना नगर शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

मोहरम सणाला दि.२० जुलै पासून प्रारंभ झाला असून दि. २८ जुलै रोजी रात्री १२ वा. कत्तलची रात मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दि.२९ जुलै रोजी दुपारी १२ वा. मोहरम उत्सव विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे. मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील समाजकंटकांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. सीआरपीसी १०७- प्रमाणे ७१, सीआरपीसी ११० प्रमाणे १४, मुंपोकाक ५६ प्रमाणे ४ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव व॒ सीआरपीसी १४४(२) नुसार १३८ समाजकंटकांना अहमदनगर मोहरम उत्सव कालावधीमध्ये तडीपार करण्यात आले आहे. तसेच सीआरपीसी कलम १४९ अन्वये ९५ जणांना शांतता व सुव्यवस्था राखणे बाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन तसेच व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशखर यादव यांनी दिली. ………………………………….
१०५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली आणि तोफखाना पोलिसांकडून मिरवणुक मार्गावर १०५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणुक मार्गावर लाकडी व लोखंडी बॅरीकेटींग करण्यात येणार आहे. तसेच संवेदनशिल ठिकाणी बॅरीकेटींगचे आतुन व बाहेरुन बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मिरवणुकीचे दुतर्फा गल्ली बोळातुन समांतर पेट्रोलिंग, टॉवर बंदोबस्त, सवारी बंदोबस्त, सेक्टर बंदोबस्त, टेंभा बंदोबसत, सरबतगाडी बंदोबस्त, मोबाईल पेट्रोलिंग व सेक्टर पेट्रोलिंग असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!