कोतवाली ठाणे : मध्यरात्री नागरिकांना लुटणारी टोळी पकडली

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर:
शहरात मध्यरात्री नागरिकांना लुटणारी टोळी पकण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे. विशाल बाबासाहेब गायकवाड, अतुल राम ननवरे, सोमेश पवन साळवे, अविनाश अशोक शेलार (सर्व रा. भिंगार अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार परि पोसई शितल मुगडे, पोसई मनोज महाजन, मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, इसराईल पठाण, अतुल काजळे, भरत गाडीलकर, प्रशांत बोरुडे, याकूब सय्यद आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि ११ एप्रिल २०२३ रोजी ते व त्यांचा मेहुणा प्रविण कोल्हे असे दोघे संगमनेर ते शिखर शिंगणापुर येथे जाण्यासाठी त्यांच्या जवळील बजाज प्लॅटीना दुचाकीवरुन अहमदनगर मार्गे जाणे करीता निघाले. या दरम्यान माळीवाडा बसस्थानकात इन गेटने इम्पीरीयल चौकाकडून जात असताना त्यांच्या दुचाकीला रात्री १० .४५ वाजण्याच्या सुमारास २० ते ३० वयोगटातील ४ जण आडवे झाले. त्यामधील भगवा शर्ट व आकाशी रंगाची जिन्स घातलेल्या सडपातळ असल्याने शर्टच्या खिशातील मोबाईल फोन हा बळजबरीने काढून घेतला व तेथून ते पळून गेले आहेत, या अमित विलास तोरकडी (रा धांदरफळ ता संगमनेर जि अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ३५६ / २०२३ भादंवि कलम ३९२.३४१.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल होताच फिर्यादी अमित तोरकडी यांनी दिलेल्या आरोपींच्या वर्णनाप्रमाणे तसेच मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा करणारे आरोपी हे भिंगार येथील राहणारे आहेत. त्यांनीच गुन्हा केला आहे ‌. ते सध्या कल्याण रोडला दिनेश हॉटेलच्यामागे एका बैठ्या चाळेत थांबलेले आहेत, अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी तात्काळ जाऊन शोध घेतला असता, त्या ठिकाणीवरुन विशाल बाबासाहेब गायकवाड, अतुल राम ननवरे, सोमेश पवन साळवे, अविनाश अशोक शेलार यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यानी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यानी मिळून गुन्हा केला असल्याची कबुली दिली. दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडुन गुन्ह्यातील माल हस्तगत करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि पवार, परि पोसई शितल मुगडे हे करीत आहेत‌.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!