कोण आरटीओ …. ? “आमचा श्यामराव आरटीओ मिनिस्टर” आहे.त्यांच्या पुढे कायदे चालत नाहीत,ते म्हणतील तो कायदा समजलं का ?

कोण आरटीओ …. ? “आमचा श्यामराव आरटीओ मिनिस्टर” आहे.त्यांच्या पुढे कायदे चालत नाहीत,ते म्हणतील तो कायदा समजलं का ?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अहमदनगर येथे सुरू असलेल्या कारभाराला प्रमुख अधिकारी श्रीमती पवार यांची पावर कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहेच. एकंदरीत नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही बाबी समोर आल्या आहेत.
वास्तविक सरकारी कर्मचारी हा जनतेचा नोकर आहे. ही बाब अनेक शासकीय कार्यालयातील काही अपवाद अधिकारी अथवा कर्मचारी विसल्याने, त्याचा त्रास नागरिकांना कधी मानसिक तर कधी आर्थिक स्वरूपात होतो. त्याचप्रमाणे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अहमदनगर येथे २ वाजता कामकाज बंद होत असल्याचे समोर येत आहे. ही बाब प्रमुख प्रशासकीय यंत्रणेला चॅलेंजिंग आहे. यामुळे एकीकडे आपल्या वाहनांच्या व (आरटीओ) संबंधित इतर कामानिमित्त तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची “श्यामरावांनी” ठरवलेल्या वेळेमुळे गोची होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अहमदनगर यांनी कामकाज केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही, पण तसे होत दिसत नसल्याचे नागरिकांच्या सांगण्यातून दिसून येत आहे. तालुक्यातून येणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो… कधी बस उशिरा येते,कधी ट्राफिक अशा समस्यांचा सामना करत ग्रामीण नागरिक हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अहमदनगर येथे पोहचतात. परंतु या कार्यालयातील काही अपवाद कर्मचारी व अधिकारी यांनी स्वयंघोषित वेळ जाहीर केली असल्याने, त्यांचा मानसिक त्रास हा नागरिकांमध्ये नाराजी पाहायला दिसते.

📤 सत्तेत जरी पवार असले तरी हुकूम श्यामरावांचाच असतो,श्यामरावांच्या पुढे पवारांची पावर कमीच….?
प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या महिला या देशभरात कार्यरत आहेत.परंतु काही पुरुष मंडळी त्यांच्यावर आपला हुकूम लादण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात स्वतःच्या “अर्थ” पूर्ण फायद्यासाठी या कर्तबगार महिलांना चुकीचे सल्ले देण्याचे काम काही पुरुष मंडळी करत असतात. अहमदनगर आरटीओमध्ये देखील या प्रकारचे प्रकार समोर येत आहेत. आरटीओ मध्ये श्यामराव ओवरलोडिंग, अर्थपूर्ण पासिंग, अर्थपूर्ण सर्टिफिकेट अश्या सुविधा लोकांना बेकायदेशीर पद्धतीने देत असल्याची माहिती मिळते.
पवारांना जरी प्रामाणिक काम करून शासनाच्या प्रमाणपात्राची गरज असली तरी श्यामरावांनी ठरविल्या शिवाय पर्याय नाही.
श्यामरावांच्या अर्थपूर्ण बेकायदेशीर कामांना पवारांचा विरोध असला तरी पवारांना उपाय नसल्याने अहमदनगर मधून बदली करून जाण्याची वेळ आली आहे व त्यासाठी पवारांनी फिल्डिंग लावल्याचे सूत्रांकडून समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!