संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांनी पाणी व इतर विकासाच्या प्रश्नावर पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने लिखाण करून अनेक प्रश्न मार्गी लावले.त्याची दखल घेत अप्रतिम मीडीयाचा चौथास्तंभ विकास पत्रकारिता पुरस्कार नुकताच त्यांना घोषित झाला,त्याचे वितरण पत्रकरदिनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक विवेक देशपांडेआदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सयोजन विवेक देशपांडे,अप्रतिम मीडीयाचे संचालक अनिल फळे.सूत्रसंचालन श्रीमती शेटे यांनी केले.