केडगाव श्री रेणुकामाता देवी मंदिरात आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती
धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते : आ. संग्राम जगताप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवीची खण नारळाने ओटी भरत महाआरती करण्यात आली, श्री रेणुका माता देवी भाविकांचे श्रद्धास्थान असून राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात, धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते, त्यासाठी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणे गरजेचे आहे या माध्यमातून आजच्या युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळेल, श्री रेणुका माता देवी चरणी प्रार्थना करतो की सर्व भाविक भक्त नागरिकांना सुख-समृद्धी व आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देवो व नगर शहराच्या उज्वल भविष्यासाठी काम करण्याची ऊर्जा व शक्ती मिळो ही भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली
नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप व पत्नी शितल जगताप यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी भाविक भक्त मोठे संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.