संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दि.२ ऑक्टोबर ते दि. १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विधी साक्षरता या विषयावर अखिल भारतीय जनजागृती अभियान राबविण्यात आले. जिल्हयांतील १३१८ ग्रामपंचायती मध्ये कायदेविषयक जनजागृती करणारे ४८०६ शिबीरे घेण्यात आली. माहिती फलके लावण्यात आली. याचा लाभ १९ लाख लोकांनी घेतला. ३७०८ ठिकाणी घरोघरी जाऊन माहिती पत्रके वाटप करून कायदेविषयक माहिती देण्यात आली. याचा लाभ ३४ लाख लोकांना मिळाला. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती रा.देशपांडे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवी मुंबई यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबविण्यात आले होते. महानगरपालिका व नगरपालिकाच्या घंटा गाड्या व रिक्षांवरून ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून कायदेविषयक माहिती देण्यात आली. या शिबीराचा २३ लाख लोकांनी लाभ घेतला. तसेच झोपडपट्या व इतर भागामध्ये आणि सर्व ग्रामपंचायतींमध्ये चित्रफिती व माहितीपर व्हिडीओ दाखविण्यात आले.
या अभियानात महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक व इतर सामाजिक कायद्यांवर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा या कार्यक्रमांना विशेष उपस्थिती लाभली. या अभियानात न्यायाधीश पी. एन कुलकर्णी, न्यायाधीश पी. के. खराटे, न्यायाधीश डी. आर. दंडे, न्यायाधीश जी. के. नंदनवार, न्यायाधीश पी. व्ही. रेमणे, न्यायाधीश व्ही. जे. डोंगरे, न्यायाधीश पी. एम. उन्हाळे, न्यायाधीश ए.पी. दिवाण, न्यायाधीश श्रीमती टी. एम. निराळे, न्यायाधीश श्रीमती एस.डी. जवळगेकर, न्यायाधीश एम.एस. तिवारी, न्यायाधीश आर.डी. चव्हाण, न्यायाधीश व्ही. आर. पाटील, न्यायाधीश श्रीमती एम. बी. अत्तार, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश एन. एन. जोशी, न्यायाधीश श्रीमती व्ही.सी. देशपांडे, न्यायाधीश श्रीमती एस. वाय. शेख, श्री. ए. पी. कुलकर्णी, न्यायाधीश वाय. एम. तिवारी, न्यायाधीश श्रीमती ए. के. मांडवगडे न्यायाधीश व्ही. पी पाटील, न्यायाधीश यु.व्ही जोशी, न्यायाधीश आर. आर. पांडे, श्रीमती पी. आर. पालवे, न्यायाधीश श्रीमती ए. ए. शिरवळकर, न्यायाधीश एस. बी. नवले, न्यायाधीश एम. डी. गौतम यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
हिवरेबाजार येथे १७ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रधान न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. सुधाकर वे यार्लगड्डा, सचिव रेवती रा. देशपांडे, पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. या अभियानाची सांगता श्रीगोंदा येथे 14 नोव्हेंबर 2021 रोजी शासकीय योजनांच्या महा मेळाव्याने झाली. न्यायमुर्ती रविंद्र व्ही. घुगे व न्यायमुर्ती एस.जी. मेहेरे यांची उपस्थिती होती. याठिकाणी शासकीय योजनांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. अहमदनगर जिल्हयातील अनेक शाळांमध्ये चित्रकला, निबंधस्पर्धा, घोषवाक्य, लघुपट अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या अभियानात जिल्हयातील अनेक वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सर्वसामान्य लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.