काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई –
भाजपा हा देशाचे संविधान व  लोकशाहीसाठी धोका आहे. भाजापच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. यामुळे काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले पुढे म्हणाले, देशात राजकीय गणिते जुळविण्याच्या हेतुने महाराष्ट्र  दौऱ्यात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठक झाली. या बैठकीत  झालेल्या चर्चेनंतर नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल गांधी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे.
काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!