संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – आज प्रसिद्ध सिनेअभीनेता व आखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजयजी पाटकर सर अहमदनगर येथे आले असता,त्यांचे स्वागत व सत्कार महारास्ट्र राज्य लोककलावंत संघर्ष समितीचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत नेटके पाटील केला.यावेळी प्रशांत नेटके पाटील यांनी अभिनेते विजय पाटकर यांच्याशी येऊ घातलेल्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर चर्चा करुन,महामंडळ मधिल गैरकारभार,तसेच बोगस ‘अ’ वर्ग सभासद. यात लेखक,निर्माता,अभिनेते, दिग्दर्शक,जवळजवळ प्रत्येक विभागात बोगस कसे आलेत या विषयी,करोना चा कार्यकाळ तसेच कार्यकारीणी वर अविश्वास आलेला असताना,कुठलीही वार्षिंक सभा झाली नाही.तरीही एव्हढे सभासद ‘अ’ वर्गात.हे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणुन देऊन,याविषयी गांभिर्याने चौकशीची मागणी करावी.अन्यथा आम्ही कलाकारांच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत.असे सांगितले.
करोना नंतर ऊद्दभवलेल्या आर्थिक व काम मिळण्याकरिता कलाकारांच्या समस्या,येनारया अडचणी याविषयी कशा रीतीने मार्ग काढता येईल यावर विस्तृत चर्चा झाली..प्रयत्न असा आहे की,कलाकारांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचावेत.असेही पाटकर याना सांगितले.यावेळी लोककलवंत भाऊसाहेब उडणशीवे,युवराज बनसोड आदी उपस्थित होते.