ओवेसीजी तुम्ही संरक्षण घ्या, म्हणजे आमची चिंता संपली : गृहमंत्री अमित शहा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली
-
एमआयएमचे अध्यक्ष तथा लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत भाष्य केले. अमित शहा म्हणाले की, मला सभागृहाच्या माध्यमातून सांगायचे आहे की ओवेसी जी, तुम्ही सुरक्षा घ्या आणि आमच्या समस्या सोडवा. अमित शहांनी सांगितले की, ओवेसींवरील हल्लाप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी शहा लोकसभेत देखील भाष्य करणार आहेत.

राष्ट्रपती अभिभाषणावर आजदेखील लोकसभेत चर्चा सुरुच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर भाष्य करण्याची शक्यता आहे. मोदी उद्या राज्यसभेत देखील भाष्य करणार असल्याचे कळते. दरम्यान भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी करत सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभा सभापती एम. व्यंकैया नायडू यांनी शोक संदेशाचे पठण केले. तर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील शोक संदेशाचे वाचन केले. त्यानंतर काही वेळ सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांचे निधन रविवारी मुंबई झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींनी लावलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देऊ शकतात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी राष्ट्रपती अभिभाषणानंतर मोदींवर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, अर्थव्यवस्थेत पुन्हा A नावाचा विषाणू येत आहे. A म्हणजे अंबानी आणि अडाणी. मोदी हे देशाचे दोन तुकडे करत असून, त्यात एक तुकडा हा श्रीमंताचा आहे आणि दुसरा गरीबांचा. या दोन भारतीयांमध्ये दरी वाढत आहे. गरीब भारताकडे आज बेरोजगारी आहे. राष्ट्रपती अभिभाषणात बेरोजगारीबद्दल एक वाक्य देखील नव्हते. असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता

अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात चालणार
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात चालणार आहे. पहिला टप्पा हा 31 जानेवारीपासून 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर दुसरा टप्पा हा 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 12 फेब्रुवारीपासून एक महिना अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!