संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या मनात आणि विचारातच ओबीसी आरक्षणाचा विरोध असेल तर कोणतेही कारण शोधता येते. यामुळे ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. केंद्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटामध्ये त्रुटी असल्यामुळे देता येणार नाही असे स्पष्ट केलं आहे. यामुळेराज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला डेटा गोळा करण्याची सूचना दिली आहे. परंतु राज्य सरकार जातीनिहाय जनगणना का करु शकत नाही असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षण विरोधी पक्षाला धडा शिकवण्याचे आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडी सरकारने शिकवले तर राज्यात जातीनिहाय जनगणना करु शकतात. त्या राज्य सरकारने केवळ केंद्र सरकार आणि जनगणना आयोगाला कळवले पाहिजे की आम्ही जनगणनेचा खर्च उचलायलाय तयार आहोत. परंतु राज्य सरकार हे करण्यासाठी तयार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.