नगर तालुक्यात संघटनेचा प्रसार करण्याची ग्वाही..!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – एकलव्य भिल्ल समाज संघटना तालुकाध्यक्षपदी संतोष माळी यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना माळी म्हणाले की नगर तालुक्यात संघटनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करून भिल्ल समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा उभारू त्याचबरोबर भिल्ल समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच तत्पर राहून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.
एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप संस्थापिका सुमित्रा पवार व महाराष्ट्र कार्याध्याक्ष सुर्यकांत पवार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीप रुषी तसेच नगर जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पवार, जिल्हा संपर्कप्रमुख शंकर माळी यांच्याा उपस्थितीत उपस्थितीत नगर तालुकाध्यक्षपदी संतोष माळी यांची निवड करण्यात आली तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.