‘एसपी साहेब’ पाथर्डीचा गुन्हेगारी घटनाक्रम चिंताजनकच ! ; ‘सिंघम्’ ची गरज

👉पाथर्डी शहरासह तालुक्यात वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या चो-या, लुटीचे प्रकार चिंताजनकच

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी-
शहरासह तालुक्यात दिवसाढवळ्या चो-या, महिलांसह शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. तालुक्यात एकंदरीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडीचा घटनाक्रम पाहता कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का?, असा सवाल पाथर्डी पोलिस ठाण्याभोवती उपस्थितीत होत आहे. यामुळेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पाथर्डी पोलिसांना विशेषतः अधिका-यांना ‘सिंघम’च्या भुमिकेत काम करावे लागेल. यात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जातीने लक्ष केंद्रित करणं आवश्यक झाले आहे.

पाथर्डी शहरासह तालुक्यात वाढते अवैध धंदे, भरचौकात मटके यासारखे जुगार यात अनेक युवा वर्ग गुरफटून बरबाद होत आहे. तालुक्यातील गावांसह वाड्यावस्त्यांवर गावठी हातभट्ट्या दारूंची उघड्यावर दुकाने नदीकाठी अथवा काटेरी झुडपाच्या सावलीत मैफील भरून सुरू आहेत. चिंचपूर पांगुळ नजिकच्या डोंगरदऱ्यात वसलेल्या गावांमध्ये दिवसाढवळ्या महिलेस गाडीत बसवून लुटले, अकोला गावानजीक धारदार शस्त्राने हल्ला करून शेतकऱ्यांस लुटणे या सर्व घटना तश्या पाथर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.‌ याला कारणीभूत म्हटले जाते की, पाथर्डी पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असणारा पोलिसदादा. यामुळे अनेकांशी हितसंबंध वाढले, त्यातल्या त्यात अवैध धंद्यांवाल्यांचे चांगल. यामुळे कायदा सुव्यवस्थेकडे पाथर्डी शहरासह तालुक्यात पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पाथर्डी पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून मुक्काम असणा-यांची बदली होणे आवश्यक आहे. त्यात या ठिकाणी ‘सिंघम’ च्या कार्यपद्धतीचा अधिकारी असणं आवश्यक झाला आहे. नाहीतर पाथर्डी शहरासह तालुक्यात गुन्हेगारी अधिकच फोफावल्या शिवाय राहणार नाही !,
यापूर्वीच वाढत्या गुन्हेगारीवर विशेषात: सर्व सामान्य नागरिकासह यात महिला, व्यापारी वर्ग मोठ्या दहशतीखाली आला आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी पाथर्डी चौकात एका सामाजिक कार्यकर्त्याने उपोषण केले, त्याला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतरही लुटी सारख्या घटना घडल्या. ही बाब पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने विचार करणारी आहे. पाथर्डी शहरासह तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलिसांची डागाळलेली प्रतिमा पुन्हा एकदा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सिंघम’ स्टाईलने गुन्हेगारांवर कारवाया झाल्या पाहिजेत. यात विशेषात: जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जातीने लक्ष घातले पाहिजेत, असे मत सर्व सामान्य नागरिकासह राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक, व्यापारी वर्गातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!