एसटी महामंडळामार्फत ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network

योजनेचे स्वरुप 👉स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट २०२२ पासून एसटी महामंडळामार्फत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची विशेष योजना. तसेच ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व बससेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास.
योजनेची वैशिष्ट्ये👉७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वातानुकुलित, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय.
• ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकुलित, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी बससेवांमध्येही ५० टक्के सवलत.
अटी व शर्ती 👉 प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र आवश्यक.
• ही सवलत शहरी बसेसकरीता लागू नाही.
• महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत प्रवासाची सवलत अनुज्ञेय.
तिकीट परतावा👉२६ ऑगस्ट, २०२२ नंतरच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिट परतावा देय असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामडळाचे जवळचे आगार, बसस्थानकावर तिकिटासह अर्ज व वयाच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!