राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती
लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणे : राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://www.maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या srpfgr5@rediffmail.com ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.