संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai – अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एमपीएससीकडून 2022 मध्ये होणार्या सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमपीएससीची पूर्व परीक्षा 2 जानेवारीला मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे रोजी होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
एमपीएससी वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण 13 प्रकारच्या परीक्षा घेते. याचे अंदाजे वार्षिक वेळापत्रक यूपीएससीच्या धर्तीवरच एमपीएससीने जाहीर केले आहे. परीक्षांच्या आधीच वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे परीक्षार्थींनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्चपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.
तर मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल, तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.