एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये उद्योगांच्या गरजांनुसार नवीन अभ्यासक्रमांचे अनेक पर्याय उपलब्ध

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील एमआयटी-डब्ल्यूपीयू या संस्थेने उच्च शिक्षण क्षेत्रातील चार दशकांच्या अनुभवातून देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातील या नव्या वळणाचा लाभ घेऊन प्रतिभावंत विचारवंतांची नवी पिढी घडविण्याचे लक्ष्य विद्यापीठ बाळगून आहे.

एमआयटी-डब्ल्यूपीयू २०२३-२४ या वर्षासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. इच्छुक उमेदवार १२ स्कूल्समध्ये उपलब्ध असलेल्या १५० पेक्षा जास्त पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि पीएचडी कार्यक्रमांसाठी अर्ज करू शकतात. हे कार्यक्रम विविध क्षेत्रांतील उद्योगांची माहिती करुन देतात उदा. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, विज्ञान, व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, माध्यम, फार्मसी, वाणिज्य, डिझाईन, शांतता अध्ययन, कायदा, ललित कला आणि खूप काही.

भविष्यातील नेत्यांची जडणघडण करण्यासाठी आपल्या या विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांतून उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अंतर भरून काढण्याचे एमआयटी-डब्ल्यूपीयूचे लक्ष्य आहे. याशिवाय उमेदवारांची उद्योगाच्या नेत्यांसोबतच विद्यापीठाच्या तज्ञ शिक्षकांकडून घनिष्टपणे तयारी केली जाते. ते उमेदवारांना मार्गदर्शन करण्याबरोबरच विद्यापीठातील अभ्यासक्रम विकसित करण्यावर बारीक नजर ठेवतात. उमेदवार https://bit.ly/3EmlvoU या ठिकाणी आपली अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांची एमआयटी-डब्ल्यूपीयू सीईटी देणे आवश्यक आहे.
एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, आमच्या पदवीपूर्व, पदवी आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज आता स्वीकारण्यात येत आहेत, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. एमआयटी-डब्ल्यूपीयूमधील आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर आणि त्यांच्या समुदायासाठी तयारी करणारे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यावर आमचा विश्वास आहे.

टीसीएस, टेक महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, टाटा टेक्नॉलॉजीज, थर्मॅक्स लिमिटेड, आयबीएम इंडिया, इन्फोसिस, स्कोडा ऑटो, आणि एमक्यूर फार्मास्युटिकल्स यांसारख्या नामांकित कंपन्यांशी असलेले सहकार्य हे यात उल्लेखनीय आहेत. या भक्कम अशा उद्योगांच्या जाळ्याचा फायदा घेत विद्यापीठ समूहाला उद्योगासाठी तयार करते. तसेच, उद्योगातील प्रत्यक्ष शिक्षणाच्या बरोबरीनेच या सहकार्यामुळे मोठ्या समूहांमध्ये इंटर्नशिप आणि नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग सुलभ होतो.त्यामुळे एमआयटी-डब्ल्यूपीयू उमेदवारांना व्यावसायिक जगात यशाच्या शिखराचा मार्ग मोकळा होतो.
शिवाय, जागतिक दर्जाच्या कल्पना आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्याची आपली भूमिका पार पाडण्यासाठी विद्यापीठाने डीकिन विद्यापीठ, ईस्टर्न मिशिगन विद्यापीठ, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, विस्कॉन्सिन विद्यापीठ, मॅक्वेरी विद्यापीठ, व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठ, नॉटिंघम ट्रेंट विद्यापीठ यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.
एमआयटी-डब्ल्यूपीयूमधील सेंटर ऑफ इंडस्ट्री अॅकॅडेमिया पार्टनरशिपच्या (सीआयएपी) माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, उच्च शिक्षण, इंटर्नशिप, उद्योजकतेच्या संधी आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध प्रकारच्या करिअर सेवा पुरविल्या जातात. एमआयटी-डब्ल्यूपीयू मधून नियमित भरती करणाऱ्यांमध्ये अॅमेझॉन, रिलायन्स, फोक्सवॅगन, अॅमडॉक्स, बार्कलेज, टीसीएस , मायक्रोसॉफ्ट, आणि आयबीएम या सारख्या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.
एमआयटी-डब्ल्यूपीयू ६५ एकरावर पसरलेले असून ते अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. बारा स्कूल्स आणि ३० हून अधिक शैक्षणिक विभागांमध्ये दरवर्षी १८,००० हून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!