एनडीए पक्षाच्या नेतेपदी नरेेंद्र मोदी यांची निवड ः बैठकीस 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली ः 2024 लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.5 जून) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ‘एनडीए’पक्षाची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडली. तासभर झालेल्या बैठकीस नरेेंद्र मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड करून घोषित करण्यात आले. तसेच अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रीपद हवे आहे. एनडीए संसदीय पक्षाची बैठक 7 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर 8 जून रोजी मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
या एनडीए पक्षाच्या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. समजलेल्या माहितीनुसार, एनडीए पक्षाच्या खासदारांची दि. 7 जूनला बैठक होणार आहे. यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळे दरम्यान ते राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शहा व जेपी नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी वन टू वन बोलण्याची आणि नवीन सरकारच्या स्वरूपावर चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकी दरम्यान पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यानंतर व मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली आहे.
समजलेल्या माहितीनुसार एनडीएच्या मित्रपक्षांनी मंत्रालयांची यादी सादर केली आहे. या टीडीपीने 6 मंत्रालये व सभापतीपद मागितले. टीडीपीने 6 मंत्रालयांसह सभापतीपदाची मागणी केली. त्याबरोबर जेडीयूने 3, चिरागने 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार), मांझीने एक, शिंदे यांनी 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार) मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्याबरोबर काहींना निवडणुकीपूर्वी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते.