एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहत होत्या जया बच्चन आणि रेखा

बिग बी अमिताभ बच्चन आणि अष्टपैलू अभिनेत्री रेखा यांचे प्रेमसंबंध कधीही लपून राहीलेले नाही. जेवढी मोठ्या पडद्यावर यांची जोडी हीट होती. तेवढीच ती खऱ्या आयुष्यातही होती. अमिताभ यांच्या प्रेमात पडण्याआधी रेखा आणि जया बच्चनही जवळच्या मैत्रिणी होत्या. जया बंगाली असल्याने रेखा त्यांना दीदीभाई म्हणजेच मोठी ताई या नावाने हाक मारायच्या पण नंतर या नात्यात दुरावा आला.

रेखा यांनी अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या एका टॉक शोमध्ये याचा खुलासा केला आहे. सिमी यांनी रेखाला जयाबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल विचारले . त्यावेळी रेखाने जया या माझ्या दीदीभाई असल्याचे सांगितले. तसेच मुंबईत नवीन आले असता जया या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. एवढंच मला माहित होते.  अभिनयक्षेत्रात जया अमिताभ यांच्यापेक्षा सिनियर होत्या. पण तरीही अमिताभ यांच्यासमोर त्या नर्व्हस व्हायच्या. जया यांच्या व्यक्तीमत्वाने मी प्रभावित झाल्याचंही रेखाने या शोमध्ये म्हटले होते.त्याचबरोबर मुंबईत नवीन आल्यावर रेखा ज्या बिल्डिंगमध्ये राहायची त्याच बिल्डिंगमध्ये जया राहत होत्या. रेखा त्यांना आदराने दीदीभाई म्हणायच्या.

यासिर उस्मान यांच्या रेखा- ‘कैसी पहेली जिंदगानी’ या पुस्तकातही जया यांचे अमिताभ यांच्याबरोबर लग्न होण्याआधी त्या रेखाबरोबर एकाच इमारतीत एकाच फ्लॅटमध्ये राहायच्या असे सांगण्यात आले आहे. तसेच जया खूप समजदार असून त्यांचे स्वत:चे असे प्रभावित व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यात खूप उर्जा असून त्या त्यांच्या प्रशंसकही असल्याचं रेखाने म्हटलं होते.
अमिताभ यांच्याबरोबरच्या अफेयर्सच्या चर्चांमुळे दोघींच्या नात्यात दुरावा आला. पण आजही त्या दीदीभाई असून त्या कायम माझ्यासाठी दीदीभाई राहणार असल्याचे रेखा यांनी म्हटले आहे. तसेच यामुळेच आजही आम्ही दोघी कधी कार्यक्रमात एकत्र भेटलो. तर एकमेकींना नक्कीच प्रेमाने भेटतो. असंही रेखा यांनी टॉक शो मध्ये सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!