एकाच दिवशी 100 विद्यार्थ्यांचे बँकेत खाते ; चिंचपूर पांगुळ बॅंक ऑफ महाराष्ट्र अधिकारी, कर्मचा-यांचा वामनभाऊ विद्यालयाकडून सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डी- तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे “विद्यालय आपल्या दारी” या उपक्रमातंर्गत स्थानिक बॅक ऑफ महाराष्ट्र बँकेत वामनभाऊ विद्यालयातील बॅंकेत खाते नसलेल्यां 100 विद्यार्थ्यांचे बँकेत खाते एकाच दिवशी उघडण्यात आले. या दरम्यान विद्यालय आपल्या दारी” या उपक्रमास साथ दिल्याने चिंचपूर पांगुळ बॅंक ऑफ महाराष्ट्र अधिकारी, कर्मचा-यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बँक आपल्या दारी” या उपक्रमातून सर्व वर्गशिक्षकांच्या सहकार्याने ज्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते नाहीत अशा सर्व विद्यार्थ्याचे बॅक खाते बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा चिंचपुर पांगुळ येथे एका दिवसात बँकेचे शाखाधिकारी नागेश शिरसाठ ,रोखपाल मनोज वनारसे ,कृष्णा गरड यांनी विद्यालयात येऊन बँक खाते पासबुक व एटीएम कार्ड विदयार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करत वाटप केले.
सद्य परिस्थितीत मुलांची गैरसोय टाळून अतिशय कमी वेळेत खाते उघडून दिले. त्याबद्दल बँक शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक संजय घिगे सर यांनी शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करत आभार मानले. यावेळी श्री भालेराव सर, श्री मरकड सर,सौ.गर्जे मॅडम ,घुले सर व सुदर्शन बडे ,इतर शिक्षक तसेच पालक आणि विदयार्थी उपस्थित होते.

संकलन👉 पत्रकार सोमराज बडे
☎️९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!