उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद‌ : राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे

👉आजही जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीपैकी सर्वाधिक निधी हा उत्तरेकडे नेला जातो
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी-
सन १९८५ सालापासून नगर जिल्ह्याचे विभाजन करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद केला जातो. आजही जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीपैकी सर्वाधिक निधी हा उत्तरेकडे नेला जातो. मात्र ज्या ज्यावेळी अशी मागणी पुढे येते. उत्तरेतील नेते मंडळी मुख्यालय श्रीरामपूरला असावे की, संगमनेरला यावरून वादाचा बनाव निर्माण करून मुख्य मागणीवरून लक्ष विचलित करतात, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केली
संवाद यात्रेनिमित्त पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील आयोजित मेळाव्यात ्ळ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, अमोल वाघ, राजेंद्र मस्के, रफिक शेख, प्रकाश शेलार, अभिजीत ससाने, राहुल गवळी आदीची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ढाकणे म्हणाले की, उत्तर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नगरच्या दक्षिण भागावर कायमच अन्याय होत आलेला आहे. राजकीय सोयीसाठी म्हणून या भागाकडे उत्तरेतील नेत्यांनी पाहिली सत्ता मिळवली आणि या दुष्काळी भागावर समस्या सोडवण्याची वेळ येते, तेव्हा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीपैकी सर्वाधिक निधी उत्तरेत पळवला जातो. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या भागाचा वापर काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक केला जातो.

आजची परिस्थिती वेगळी नाही १९८५ ला दक्षिण जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी एकत्रितरित्या एक पत्र देऊन जिल्हा विभाजनाची मागणी केली. तेव्हापासून आजपर्यंत ही मागणी प्रलंबित आहे. नगर जिल्ह्याला अहिल्यादेवीचे नाव देण्यास काय हरकत आहे.? मात्र त्यालाही सत्तेतील पुढारी विरोध करतात हे आपले दुर्दैव आहे .
संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत आहोत.प्राजक्ता तनपुरेंनी राहुरी मतदारसंघातील पाथर्डीतील ३९गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढला दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार गेले. आणि आज या भागातील विकासासाठी निधी मिळवायला तनपुरे यांना संघर्ष करावा लागतो.
यावेळी बोलतांना आमदार तनपुरे म्हणाले, राज्य सरकार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या मानसिकतेत नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांना पराभवाची भीती सतावते आहे. त्यामुळेच ढाकणे यांनी काढलेली संवाद यात्रा लोकांना धीर देणारी ठरत आहे, अशा यात्रेच्या माध्यमातून नेते व जनता यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होते. आजचे भाजप सरकार शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. मिरी भागातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण शिराळ येथे उपकेंद्राची मंजुरी घेतली त्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल.अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्येसाठी फोन लावला असता त्यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा प्रचंड दबाव दिसून येतो लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना फिल्डवर बोलवले तर पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आम्ही येऊ शकत नाही.
असे उत्तर अधिकारी आम्हाला देतात आम्हाला पण जनतेने आमदार म्हणून संधी दिली आहे.लोकांचे प्रश्न सोडवायचे नसतील मग आम्ही आमदार काय फक्त मिरवायला झालो आहोत का?
त्यामुळे हे सर्व ओळखून यापुढे जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवशंकर राजळे,रफिक शेख,भगवान दराडे,बंडू पाटील बोरुडे, राहुल गवळी,आदींची भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव दुसंग यांनी तर आभार महेंद्र सोलाट यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!