संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार तिरथसिंग रावत व मध्य प्रदेशचे पर्यटन विभाग अध्यक्ष विनोद गोटिया यांनी भेट दिली असता त्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करतांना अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अभियानप्रमुख शशांक कुलकर्णी, सचिन पारखी, बाबासाहेब सानप, दिलीप भालसिंग, राजेंद्र सातपुते, अमित गटणे, करण भळगट आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विनोद गोटिया यांनी देशातील देवस्थानाचा समन्वय साधून त्या देवस्थानची महती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे देवस्थानाचा विकासाबरोबरच पर्यटनासही चालना मिळेल, असे सांगून नगरची श्री विशाल गणेश मंदिरातील मुर्ती नावाप्रमाणेच विशाल असून, दर्शनाने धन्य झालो, असे सांगितले.