👉भाजपा युवा वॉरिअर्सच्यावतीने स्टेशन रोड परिसरात ई-श्रमिक कार्डची नोंदणी व वितरण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांसाठी विविध लाभदायी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणार्याच्या श्रमाला मोल मिळाचे या उद्देशाने सुरु केलेल्या ई-श्रमिक योजनेमुळे अनेक छोटया-मोठ्या कारागिर, कामगारांना लाभ होत आहे. या योजनेच्या लाभार्थींना सुरक्षा साहित्य विमा कवच, त्याचबरोबर त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. तेव्हा या योजनेचा लाभ संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकत्यांनी करावे. सर्वसामान्यांना त्यांचे हक मिळवून देण्यासाठी भाजप युवा वॉरिअर्स घेत असलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपा युवा वॉरिअर्सच्यावतीने प्रभाग क्र.१५, स्टेशन रोड परिसरातील आदर्श गौतमनगर, रोहिदास बाडी येथे केंद्र सरकारच्या ई-श्रमिक कार्डची नोंदणी व वितरण भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अँड.बिचेक नाईक, कॅटो उपाध्यक्ष बसंत राठोड, युवा बॉरिअर्सचे शहर विशाल खैरे, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, भाजपा कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, दुबा बॉरिअर्स उपाध्यक्ष राहुल ताबे, केंद्र प्रमुख विजय पास, किशोर कटारे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विशाल खैरे म्हणाले, भाजप युवा चॉरिअर्सच्यावतीने समाजातातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक, अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांचा लाभ संबंधितापर्यंत पोहचविण्याचे काम । कार्यकर्ते करत आहे. स्टेशन रोड परिसरात अनेक कामगार कारागिर राहत असल्याचे त्यांच्यासाठीच्या केंद्रीय ई-श्रमिक योजनांची माहिती देऊन त्यांचा या योजनेत समावेश करून घेतला आहे. यापुढील काळातही असेच काम बुवा वॉरिअसंच्यवतीने सुरु राहील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय घासे यांनी केले तर आभार किशोर कटोरे यांनी मानले. यावेळी हिरा पाइळे, गणेश जाधव, भागवत कुरघने, सचिन माने, गणेश जाधव, सागर सपकाळ, राजू, परदेशी बाबूलाल शिंगरे, संतोष शेळके, रोहित घासे. अशोक ऐवरे, विशाल डोंगरे, आकाश करवरे, चाचा साळये, काळूराम खुडे, महेश शेळके आदि उपस्थित होते.