संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर : ऑटो रिक्षा फिटनेस दंड शासनाने स्थगित केला या निर्णयाचे स्वागत जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वागत करुन फाटाके फोडण्यात आले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश घुले, वैभव जगताप, विलास कराळे, दत्ता वामन, बबनराव बारस्कर, समीर कुरेशी, भैय्या पठाण, अशोक चोभे, अशोक औशिकर, लतिफ शेख, बाबा दस्तगिर, बापू दारकुंडे, विष्णू आंबेकर, रवीकिरण वाघ, नासिर खान, किशोर कुलट, अन्वर शेख, सुधाकर साळवे, फैरोज शेख, विजय शेलार, अभय पतंगे आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अविनाश घुले म्हणाले, ऑटो रिक्षाच्या फिटनेस प्रमाणपत्राचे नुतणीकर करण्यासाठी शासनाने मुदत दिली होती, परंतु या मुदतीत अनेक रिक्षा चालकांना अडचणीमुळे तो भरता आला नाही. त्यामुळे शासनाने नुतणीकरण न केलेल्या ऑटो रिक्षास प्रत्येक दिवसला 50 रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश काढण्यात आला होता, या विरोधात संघटनेने सर्वस्तरावर निवेदने, आंदोलने केली परंतु प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर त्यांनी या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून मुंबई येथे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व संघटनेचे राज्य पदाधिकारी यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा हा प्रश्न नगर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील रिक्षा चालकांचा आहे, त्याचबरोबर या दंड आकारणीतही दुजाभाव केला जात होता. मोठ्या वाहनांनाही तितकाच दंड आणि हातावर पोट असणार्यांना तितकाच. या अन्याय विरोधात तीव्र आंदोलन केल्यानंतर शासनाने दखल घेत आता हा दंड स्थगित केला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, ही दंड वसुली स्थगित झाल्याने ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यासह संघटनेने आ.जगताप व शासनाचे आभार मानून जल्लोष केला असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते कॉ.बाबा आढाव, पुणे येथील रिक्षा संघटनेचे सचिव नितीन पवार आदिंनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.दादा भुसे, आ.संग्राम जगताप आदिंची या कामी मोठे सहकार्य लाभले. याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, जिल्हा रिक्षा पंचायत, प्रजा ऑटो रिक्षा संघटना, जिल्हा परवाना धारक विद्यार्थी वाहतूक संघटना, शाहिद फ्रेंड सर्कल रिक्षा संघटना, लोकराज्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटना, अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.