राज्यमंत्री तथा श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष अशितोष काळे यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे अध्यक्ष आशुतोष काळे यांना शासनाने राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याबद्दल अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आशुतोष काळे म्हणाले की,आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिकेच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन विकास कामांचे नियोजन सुरू आहे आ.संग्राम जगताप विकासाचे एख एक योजना हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे काम करत आहे. आ. संग्राम जगताप व महापौर व उपमहापौर यांच्या शहर विकासाच्या कार्यास माझ्या शुभेच्छा असे ते म्हणाले.
श्री.साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष व नामदार आशुतोष काळे यांनी अहमदनगर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा मनपाच्या वतीने सत्कार करताना आमदार संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक आरिफ शेख, पै शिवाजी चव्हाण, संतोष भोसले, प्रा संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.