पाथर्डी बाजार समिती निवडणूक : आ. राजळेंच्या आदिनाथ मंडळाला १७ जागा, जगदंबा मंडळाला १ जागा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
‍ Nagar Reporter
पाथर्डी
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. मोनिकाताई राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने १७ जागा जिंकत ‘सत्ता मिळावली. तर ॲड प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीला एका जागेवर (हमाल मापाडी मतदारसंघ) समाधान मानावे लागले.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी निवडणुकीत काल सरासरी ९७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणी होवून सर्वप्रथम सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघाची मतमोजणी झाली. यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर आ. राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने विजय मिळवला. यामध्ये वैभव धर्मनाथ खलाटे, जगन्नाथ दादा खेडकर, नानासाहेब यशवंत गाडे, मधुकर शंकर देशमुख, बाळासाहेब मारुती नागरगोजे, सुभाष रभाजी बर्डे, अजय शेषराव रक्ताटे विजयी झाले..
यानंतर सहकारी सोसायटी मतदारसंघातील महिला राखीव जागांची मतमोजणी झाली. यामध्ये सुनिता रामनाथ कोलते, स्मिता पांडुरंग लाड या विजयी झाल्या. या पाठोपाठ सहकारी सोसायटी मतदार संघ (इतर मागासवर्गीय)- अरुण गोविंद रायकर, सहकारी सोसायटी मतदार संघ (विमुक्त भटक्या जमाती) – जिजाबा तात्याबा लोंढे हे विजयी झाले.
यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेवर शेषराव सुर्यभान कचरे, किरण लक्ष्मण राठोड. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या अनु. जाती जमाती जागेवर रविंद्र बाबुराव आरोळे, ग्रामपंचायत मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागेवर नारायण भगवान पालवे हे विजयी झाले.
व्यापारी/आडते मतदार संघात कुंडलिक गणपत आव्हाड, प्रशांत प्रकाशलाल मंडलेचा हे सर्व आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार विजयी झाले. तर अॅड. ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडील हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेवर विजय मिळवता आला. या जागेवर बाबासाहेब केदार हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले.
आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने सोसायटी मतदार संघातील सर्व जागा जिंकल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. सुरुवातीला सुरु केलेला जल्लोष शेवटच्या जागेपर्यंत कायम होता.
१८ पैकी १७ जागा जिंकल्यानंतर आ. मोनिका राजळे समर्थकांनी स्व. राजीव राजळे यांच्या प्रतिमेसह जल्लोष केला. स्व. राजीवर राजळे हयात असतांना ॲड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात गेलेली बाजार समिती आ. राजळे यांनी पुन्हा ताब्यात आणली. यामुळे एकप्रकारे मतदारांनी स्व. राजीव राजळे यांना वाहिलीली श्रद्धांजलीच ठरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!