👉आ. गोपीचंद पडळकर यांनी शूर वंजारी राजे यांच्या बद्दल दिलेली चुकीची माहिती रेकोर्ड वरून वगळण्यात यावी.
👉वंजारी राजे आद्यक्रांतीकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा उल्लेख वारंवार धर्माजी मुंडे असा चुकीचा.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर लक्षवेधी भाषण करताना वंजारी राजे आद्यक्रांतीकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा उल्लेख वारंवार धर्माजी मुंडे असा केला आहे. एका देशभक्त क्रांतीकारकाची ओळख बदलून खोटा इतिहास रचण्याचा प्रयत्न केला. पडळकरांनी एका जबाबदार अशा वरिष्ठ सभागृहात खोटी माहिती दिली आहे. ती दिलेली खोटी माहिती कामकाजातून वगळण्यात यावी व सभागृहासमोर खरा इतिहास मांडावा व देशभक्त क्रांतीकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांना न्याय द्यावा, अशी मागणी राजे धर्माजी प्रतापराव गर्जे घराण्याचे वंशज नागनाथ भारतराव गर्जे, प्रा सुनिल पाखरे यांनी विधान परिषदेचे उपसभापती डाॅ.निलमताई गो-हे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले आहे.
विरोधी पक्षनेते, विधान परिषद अंबादास दानवे यांना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारे नागनाथ भारतराव गर्जे, प्रा.सुनिल पाखरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी शूर वंजारी राजे यांचे बद्दल दिलेली चुकीची माहिती रेकोर्ड वरून वगळण्यात यावी.
विधान परिषदेतील भा. ज.पा. चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये एतिहासिक विषयावर भाष्य करताना मराठवाड्यातील आद्य क्रांतिकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा चुकीचा उल्लेख केला असून तो धर्माजी मुंढे असा वारंवार उल्लेख केला आहे. आद्य क्रांतिकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी मराठवाड्यात निजाम सत्तेला तर अहमदनगर जिल्ह्यात इंग्रज सत्तेला सळो कि पळो करून सोडले होते, राजे धर्माजी यांची राजधानी नागझरी ता. आष्टी जि. बीड हि नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने त्यांनी मराठवाड्यात निजामाला तर नगर जिल्ह्यात इंग्रजांना मोठे आव्हान उभे केले होते. निजामाचे सैनिक बीड जिल्ह्याच्या आसपास देखील फिरकत नसत. इतकी दहशत निजाम सत्तेवर त्यांची होती.
धर्माजी प्रतापराव गर्जे यांचे पूर्वज शूरयोद्धे नरवीर बागोजी प्रतापराव गर्जे यांनी प्रतापगडाच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. तेव्हा त्यांना छत्रपती शिवरायांनी प्रतापराव हा किताब देवून वंजारी जातीचे राजे पद बहाल केले होते, तेव्हापासून नागझरीच्या गर्जे राजे घराण्याला प्रतापराव घराणे म्हणून ओळखले जाऊ लागले. शूर योद्धे बागोजी प्रतापराव गर्जे यांना राजे पद मिळाल्यानंतर त्यांनी राजधानी म्हणून नागझरी या ठिकाणाची निवड केली. व तेथे किल्ला उभारला, आज हि तो किल्ला नागझरी येथे शेवट्च्या घटका मोजत आहे. परंतु शासनाचे त्याकडे दुर्लक्ष केले आहे, व किल्याआजच्या खाली शूर योद्धे राजेबागोजी प्रतापराव गर्जे यांची ३०० वर्षापूर्वीची दगडी, छत्रीची समाधी आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे.
त्याच राजे बागोजी प्रतापराव गर्जे यांचे वंशज धर्माजी प्रतापराव गर्जे हे शूर राजे होते, या शूर गर्जे राजे घराण्याला त्या काळी प्रतापराव घराणे म्हणून ओळखले जात असे, या गर्जे राजे घराण्याचे अनेक गांवात गढ्या व किल्ले होते, त्या किल्ल्यामध्ये आज हि गर्जे राजे परिवारातील लोक राहतात. किंवा त्यांच्या ताब्यात आहेत. तसेच धार्मिक ग्रंथात व ऐतिहासिक पुस्तकात राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा उल्लेख आहे. तसेच ऐतिहासिक वास्तुजन्य पुरावे देखील धर्माजी प्रतापराव गर्जे नागझरी संस्थांचे राजे होते, याचे स्पष्ट पुरावे आहेत. हातोला येथील किल्ल्यावर त्यांचे निजाम व इंग्रज यांच्याशी इ.स. १८१८ ला युद्ध झाले. व त्या युद्धात इंग्रज व निजाम एकत्र येउन देखील त्यांचा राजे धर्माजी यांच्या पुढे निभाव लागत नव्हता. शेवट इंग्रज व निजाम यांनी दारुगोळा व तोफखाना यांचा वापर करून किल्ला उध्वस्त केला तेव्हा राजे धर्माजी यांनी शत्रूला हुलकावणी देत डोईठाण इकडे आगेकूच केली व नंतर त्यांनी भूमिगत राहून सैन्यासह गनिमी काव्याने डोंगर दर्यातून इंग्रजांशी कडवा संघर्ष केला. असा या पराक्रमी गर्जे राजे या प्रतापराव घराण्यातील वंजारी राज्याचा धर्माजी गर्जे असा उल्लेख करण्याएवजी आमदार पडळकर यांनी वारंवार धर्माजी मुंढे असा उल्लेख करून चुकीचा इतिहास एका जबाबदार लोकप्रतिनिधीने वरिष्ठ सभागृहात मांडला आहे. व त्यांची ती सभागृहातील भाषणाची क्लिप समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. त्यामुळे राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांच्या वंशाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. तरी एका देशभक्त शूर क्रांतिकारकाचे नांव बदलून चुकीचा इतिहास निर्माण करण्याची हि मोठी चूक त्वरित गंभीर दखल घेवून सभागृहातील आमदार पडळकरांचे ते भाषण कामकाजातून वगळावे व सभागृहात तो इतिहास योग्य पद्धतीने व खरा इतिहास मांडावा. हे राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा वंशज असल्याने एका थोर देशभक्त शूरक्रांतीकारी राजावर अन्याय न होता न्याय देण्यात यावा ही अपेक्षा आहे, असे नागनाथ भारतराव गर्जे यांनी म्हटले आहे.