संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आष्टी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे नागपूर विधानभवन दालनात प्रकाशन करण्यात आले.
आष्टी तालका युवा पत्रकार संघ प्रत्येकवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करून सर्वसामान्यांना मोफत वितरण करण्यात येत असते सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे नागपूर येथील विधान भवनाच्या दालनात दि.२६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार,इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री तथा बीड पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पत्रकार संघाच्या कार्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, पत्रकार अक्षय विधाते,समीर शेख, रामदास राऊत, पत्रकार संजय देशमुख आदी उपस्थित होते.
युवा पत्रकार संघाचा इतर संघाने आदर्श घ्यावा – ना.अतुल सावे
आष्टीच्या युवा पत्रकार संघाने आजपर्यत विविध सामाजिक उपक्रम राबविलेले असून त्यांच्या हातून असेच विविध सामाजिक उपक्रम घडो तसेच या पत्रकार संघाचा आदर्श राज्यातील इतर पत्रकार संघाने घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.