संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बीड – जिल्ह्यातील जनतेला बहुप्रतिक्षेत असणारा आष्टी- अहमदनगर रेल्वेचा शुभारंभ शुक्रवारी ( दि.२३) सकाळी ११ वा. केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे, मुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील, भाजपा नेत्या माजीमंञी पंकजाताई मुंडे, खासदार प्रितम मुंडे, खा.रजनी पाटील आदिंसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवीन आष्टी येथील रेल्वेस्टेशनची व कार्यक्रमस्थळ, व्यासपीठ, मंडप, पार्किंग व्यवस्थेची बीडच्या खा.प्रितम मुंडे, आ.सुरेश आण्णा धस, माजी भीमराव धोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पाहणी केली.
👉संकलन-सोमराज बडे
९३७२२९५७५७