आरोग्य उपसंचालकांची जिल्हा रुग्णाालयास आकस्मिक भेट भेटीदरम्यान घेतला आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर – आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत विविध वॉर्डना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णांसमवेत संवाद साधून त्यांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डवरे आदी उपस्थित होते.
श्रीमती गायकवाड म्हणाल्या, मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी होण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची शोध मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.
श्रीमती गायकवाड यांनी गरोदर माता नोंदणी ते प्रसुती सेवा, प्रसुती प्रश्चात सेवा, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया आदींचाही विस्तृत आढावा घेतला.
बैठकीस आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिसेविका आदींची उपस्थिती होती.