संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – आमदार संग्राम जगताप यांच्या वााढदिवसानिमित्ताने अहमदनगर शहरात वििविध उपक्रम घेण्यात आले.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येते खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शाळेचे साहित्य, क्रीडा साहित्य, क्रिकेट किट, बास्केट बॉल किट, फुटबॉल किटचे साहित्य वाटप करून परिसरात 51 वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, नगर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, नगर श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष दादासाहेब दरेकर, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल महस्के, दिलीप कटारिया, सचिन जगताप, वैभव महस्के, अमित कचरे, किरण बारस्कर, महेश कराळे, सचिन भापकर, मंगेश आजबे, अथर्व कुलकर्णी, संकेत पुंड आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की धावपळीच्या जीवनात युवक मैदानापासून दुरावत असून, निरोगी आरोग्यासाठी व धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे युवकांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. व आपण मैदानी खेळ खेळलो तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते व दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून मैदानी खेळ खेळणे पाहिजे व वाढदिवस हा औचित्य असतो त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे प्रत्येकाने कोणाचेही कुटुंबात वाढदिवस असो किंवा चांगले औचित्य असले त्यांनी सामाजिक संघटना व सामाजिक संस्था यांच्या पर्यंत मदत करण्याचा प्रयत्न करावे व कोरोना काळात अनेक संस्था संघटना अनेकांना मदत केली आहे मदत करण्याचे काम नगरकरांनी जवळून पाहिले आहे नगर शहरामध्ये संकट आले तरी लोक एकत्र होऊन सर्वांसाठी मदत करतात तसेच या क्रीडा साहित्य वाटपाच्या उपक्रमाबद्दल आमदार जगताप यांनी कौतुक तसेच या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर, नगर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, नगर श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष दादासाहेब दरेकर यांचे आ.संग्राम जगताप यांनी उपक्रमाबद्दल कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत तोडमल यांनी केले तर आभार दिलीप कटारिया यांनी मानले.