आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी

👉महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाचजणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्त्यांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीरभाई यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला रोजी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बाबतच्या शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम 2012 चे नियम 4 (क) ते 4 (छ) नुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्तीनाम निर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यासपात्र आहे. वैद्यकीय व्यवसायी, शिक्षण तज्ज्ञ, सनदी लेखापरीक्षक, अभियांत्रिकी पदवीधारक,अभिवक्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त, समाजकल्याणकार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांची नियुक्ती नामनिर्देशितसदस्य म्हणून करता येईल, असे या निकषात स्पष्ट केले गेले आहे.
पण मनपाने केलेल्या सर्व पाचही नियुक्त्या केवळ समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी याच एकमेव निकषात केल्या आहेत. त्यामुळे अन्य निकषांचे पालन झालेले नाही, असे म्हणणे शेख यांनी याचिकेत मांडले आहे. तसेच दि. 28 डिसेंबर 2018 रोजी महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना व तसा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने 23 जानेवारी 2019 रोजी महापौर वाकळे यांच्याकडे सादर केला. प्रस्तावानंतर त्यानुसार कार्यवाही झाली नाही. तब्बल 1 वर्षाने म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी महापौरांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर सचिवांना दिले व त्यांनी त्याच दिवशी तसा फेरप्रस्ताव सादर केला. त्यानुसार 10 जानेवारी 2020 रोजी महासभा बोलावण्यात आली होती. या सभेसाठी शेळके, आढाव, शेटीया, आंधळे व बाबासाहेब गाडळकर यांचे प्रस्ताव आले होते. पण तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही प्रस्ताव निकषात बसत नसल्याने त्यांच्या नियुक्तीची शिफारस महासभेस केली नाही. महासभेने पाचही उमेदवाराचें अर्ज अमान्य करुन फेटाळले.
महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे. पण ही नियुक्ती स्वीकृत सदस्य निवडीसाठीच्या निकष व नियमानुसार झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा असलेला पदभार हा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे आल्यावर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा फेरप्रस्ताव नगर सचिवांनी 10 जून 2020 रोजी महापौर कार्यालयास सादर केला व त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत शेळके, आढाव, शेटिया व आंधळे यांचे जुनेच प्रस्ताव मंजूर झाले. तसेच गाडळकर (मयत) झाल्याने यांच्याऐवजी कातोरे यांचा नवा प्रस्तावमंजूर होऊन या पाचजणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्रठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेखर यांनी तक्रार दाखलकेली होती. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई केल्याने त्यांचे मनपा सदस्यत्व पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची महासभा होण्या आधी 29सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपातील पक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. मात्र, या बैठकीस शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याऐवजी त्यांचे पती संजय शेंडगे तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्याऐवजी त्यांचे पती धनंजय जाधव उपस्थित होते. गटनेत्यांनाच या बैठकीसउपस्थित राहण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या पतींशी केलेली चर्चाही बेकायदेशीर आहे,असाही आक्षेप शेख यांनी या याचिकेत घेतला आहे. त्यावर प्रधान सचिवांनी मनपा आयुक्तांकडून अहवालही मागवला होता. पण राज्यसरकारकडून या प्रकरणात गंभीर दखल घेतली जात नसल्याने अखेर शेख यांनीखंडपीठात याचिका दाखल केली आहे.
पण नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने 9 जणांना नोटीसा काढल्या आहेत. याचीकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.नितीन गवारे यांनी बाजु मांडली. त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड.एस.व्ही. सलगर व अ‍ॅड.झेड. ए. फारुकी यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीत सरकारच्यावतीने अ‍ॅड.एस.जे.कार्लेकर यांनी काम पाहिले. ख़ंडपीठाने या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त,मनपाचे नगरसचिव, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके, आढाव, शेटिया, कातोरे व आंधळे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 13 जुलैपर्यंत ते सादर करण्याची मुदत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!