आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य- डॉ. नीलम गोऱ्हे


👉आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त अभिवादन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे :-
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यावेळी लहुश्री पुरस्काराने अनेकांचा गौरव करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या माध्यमातून लहूश्री सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार निलेश लंके, आमदार राजू आवळे, सचिन अहिर, गजानन थरकुडे, रमेश बागवे, अविनाश साळवे, नगरसेवक बाबुराव चांदोरे, प्रशांत जगताप, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त रमेश कदम, संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब भांडे आदी उपस्थित होते.
उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करून स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मातंग समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती अशा प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. याबाबतच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी कायम पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री सचिन अहिर यांनी मुंबई येथील अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच लहुजी साळवे स्मारकासाठी देखील निधीची कमतरता होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.

👉समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही केले अभिवादन
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त समाधी स्थळास समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनीही अभिवादन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!