संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशनात जनतेच्या समस्येवर चर्चा न करता दोन दिवसात गुंडाळणारे आघाडी सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपाचे अ.नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, उपाध्यक्ष धनंजय बडे, दिलीप भालसिंग, शामराव पिंपळे, अशोक खेडकर, नरेश शेव्वरे, दादा बोटे,अनिल लांडगे, गणेश कराड, मनोज कोकाटे, संदीप जाधव, गणेश जायभाय, प्रशांत गहिले, महेश लांडगे, दत्ता नलवडे, दादा ढवण, सुनिल थोरात, डाॅ.विक्रम भोसले, महेश तवले, सागर भोपे, संतोष रायकर, रामदास बनकर, अर्चना चौधरी, मंजुश्री जोकारे, नंदा चाबुकस्वार, सचिन पालवे, अॅड अभय भोस आदिंसह भाजपाचे शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरू होणार आहे. परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाही क्रूर थट्टा ठरणार आहे. राज्यासमोर कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा ह्या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव करणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी केले आहेत. जनतेच्या प्रश्न उत्तर द्यायला हे सरकार घाबरत आहे, असे स्पष्ट झाले आहे. विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न मांडून महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चर्चा करून जनतेला न्याय द्यायचे काम होत असते. आरोग्य, रस्ते, वेगळे डेव्हलपमेंट वर गरिबांचे प्रश्न यावर साधकबाधक चर्चा होऊन कायदे पास होत असतात. राज्यात घडणार्या विविध विषयांवर चर्चा होत असते. सध्या महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपात बलात्कार, दरोडे, दोन नंबर धंदे, महिलांवरील अत्याचार भ्रष्टाचार अशा विविध समस्या महाराष्ट्र मध्ये निर्माण होत असताना त्यावर कायदे करून जनतेला न्याय द्यायचे काम सभागृहाच्या चर्चेमधून होत असते. परंतु कोणत्याही स्वरूपाची चर्चा न करता कोणत्याही चर्चेला न घेता दोन दिवसांचे अधिवेशन ठेवून शासन महाराष्ट्रातील सत्तेत असणारे आघाडी सरकार जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरता आहे. मधल्या काळात भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार यामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आणि काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोविड महामारी च्या काळामध्ये हे शासन स्पेशल अपयशी ठरले आहे. त्यांनी कोणत्याही स्वरूपाचे covid-19 रुग्णांना मदत केली नाही तसेच लोक डाऊन मुळे अडचणीत असणाऱ्या जनतेला कुठल्याही स्वरूपाची आर्थिक पॅकेज दिले नाही शासनाच्या दुर्लक्ष ते पणामुळे व हलगर्जीपणामुळे देशांमध्ये महाराष्ट्रात राज्यात सगळ्यात जास्त covid-19 सर्वात जास्त कोरडी मृत्यू झाले आहेत. त्यानुसार विषयावर विरोधी पक्ष प्रश्नाचा भडिमार करीत व हे आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेसमोर उघडे पाटील अशा भीतीपोटी अधिवेशन गुंडाळून फक्त दोन दिवसाचे ठेवण्यात आले, अशा जुलमी व अत्याचारी शासनाचा धिक्कार करतो राष्ट्रपती व राज्यपाल यांनी या शासनाच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात केली आहे.