अ.नगर फिल्म फाऊंडेशनच्या ४ थ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास नगरकर सज्ज

👉६० देशातील निवडक चित्रपटांची मेजवानी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
अहमदनगर फिल्म फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप ,उपमहापौर गणेश भोसले, स्वागताध्यक्ष गौतम मुनोत, सचिव प्रशांत जठार, निमंत्रक शशिकांत नजान, विराज मुनोत, वसी खान, सिद्धार्थ टेमकर , महेश गदादे , सिद्धार्थ खंडागळे हे अहमदनगर फिल्म फाऊंडेशनचे सदस्य तर जीतो ट्रेड फेअरचे सुरेश कांकरिया, अमित मुथा, आलोक मुनोत, सुनील मुनोत आदिंच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, अहमदनगरच्या चित्रपट क्षेत्रात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर मोलाचे कार्य आहे. या चित्रपट निर्मिती, कलाकारांना प्रोत्साहन, नगर शहरात चित्रीकरण , चित्रपट कलाकारांना रोजगार उपलब्ध करण्याचे काम या फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे.

या महोत्सवामध्ये आत्तापर्यंत ६० देशामधून ४०० पेक्षा जास्त चित्रपटांचा सहभाग झाला आहे. विविध देशातील वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या व तिथल्या संस्कृतीचे विश्लेषण करणाऱ्या, तिथल्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लघुपट व चित्रपट या महोत्सवा दरम्यान नगरच्या चित्रपट रसिकांना पहाण्यास मिळणार आहेत . भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर या महोत्सवाच्या आयोजनास सहकार्य करीत आहेत . तसेच चित्रपट आणि लघुपट निवड समीतीचे अध्यक्ष म्हणून प्राख्यात चित्रपट दिग्दर्शक, समीक्षक, प्राध्यापक संतोष पठारे यानी पदभार स्विकारला आहे.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या आणि नगर मधील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे . नगर हे चित्रपटासाठी अत्यंत पोषक शहर आहे. इथे चित्रीकरण करण्यासाठी खूप वाव आहे. बाहेरील निर्मिती संस्थांना नगरमध्ये चित्रीकरण करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत, असे चित्रपट निर्माते आणि महोत्सवाचे स्वागताध्यक्ष गौतम मुनोत यांनी सांगितले . या महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगरमध्ये चित्रपट उद्योगाला चालना मिळावी, या हेतूने नगरमधील सर्व चित्रीकरण स्थळांची यादी केली जाणार आहे. असे अहमदनगर फिल्म फाऊंडेशनचे सचिव प्रशांत जठार यांनी सांगितले आहे.
अहमदनगर येथे दि. दि.२६,२७ आणि २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगरमध्ये देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विविध विषयांवरील लघुपट, माहितीपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांनी मिळणार आहे, अशी माहिती निमंत्रक शशिकांत नजान यांनी दिली.
चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी
संयोजन समिती परिश्रम घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!