‘अ.नगर एलसीबी’ची कारवाई ; चैन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या दोघांना पकडून ८ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चैन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. या आरोपींकडून ८ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दुचाकी हस्तगत करण्याची कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. सलीम गुलाब शेख (वय ३७, रा. राहुरी खु, ता. राहुरी हल्ली रा. वाळुंज पंढरपुर, जि. छ. संभाजीनगर), फिरोज शेख ऊर्फ लखन अजिज शेख ( वय ३०, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत, तिसरा आरोपी हा फरार असलेल्याची माहिती अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्यासह एलसीबी टिम’ उपस्थित होती.

जेऊर टोलनाका, छत्रपती संभाजीनगर रोड अहमदनगर येथे जाऊन फळ विक्रेते व वाहन चालक असे वेशांतर करुन सापळा लावून कारवाई केली आहे. या कारवाईत अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या टिममधील पोसई सोपान गोरे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, मनोज गोसावी, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, भिमराज खसे, पोकॉ मच्छिद्र बर्डे, प्रशांत राठोड, मपोकॉ ज्योती शिंदे व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंनी केली आहे.
दोघा आरोपींनी अहमदनगर शहर व भिंगार परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे, असे श्री ओला म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!