संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शहरात विक्रीसाठी आणलेल्या लाखो रुपयांच्या अवैध गुटख्याच्या दोन वाहनांवर नाशिक आयजी पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर यांच्या संयुक्त ‘टिम’ने टाकलेल्या छाप्यांमध्ये लाखो रुपयांच्या अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्र नाशिक आयजी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, तोफखान्याचे पोउनि समाधान सोळंके, ‘आयजी टिम’चे पोहेकॉ शकिल शेख, पोहेकॉ बाबासाहेब फसले, पोहेकॉ सचिन जाधव, पोना हेमंत खंडागळे व अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या संयुक्त ‘टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १७ डिसेंबर २०२२ ला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांना माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील दिल्लीगेट परिसरात असलेले डी एड कॉलेजसमोरील पार्किंगमध्ये दोन रंगा मालवाहतून टॅम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या गुटखा हा विक्रीसाठी आलेला आहे, ही माहिती अहमदनगर शहरामध्ये कार्यरत असलेले आयजी पथकातील पोहेकॉ शकिल शेख यांना व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांना त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले. नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांनी
नाशिक आयजी यांच्या ‘विशेष टिम’चे पोलीस अंमलदार व नगर शहर डिवायएसपी यांच्या कार्यालयातील अमलदार यांचे पथक निर्माण करुन पथकामध्ये अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना बोलावून माहिती सांगितली. त्यांनी तात्काळ दोन पंचाना बोलावून घेतले व त्यांच्यासह डी एड कॉलेजसमोरील पार्किंगमध्ये जाऊन ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. माहितीनुसार अशोक लेलंड जोतो (एमएच १४ जीडी ७६२०) व टाटा एसीई झीप पांढ-या रंगाचा (एमएच १७ बीडी ६०२९) अशी दोन वाहने मिळून आली. दोन्ही चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव हरिश खेमकरण खंडोगा (वय ३६, रा. प्रवरानगर ता राहता जि अहमदनगर ), दिपक पोपट यादव (वय ३९, रा. ब्राम्हणगल्ली माळीवाडा अहमदनगर) असे सांगितले. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा मिळून आला, यात २ लाख ९५ हजार ६८० रुपयांचा हिरा पान मसाला एक्सएल पॅक १हजार ६८० पॅकेट, ६२,८३२- रोयाल ७१७ तंबाखू एक्सएल पॅक १ हजार ४२८ पॅकेट, ४ लाख ७९ हजार १६० विमल पान मसाला किंग पॅक २४२० पॅकेट, एम सेंटेड तंबाखु ४० पॅकेट, ३७ हजार ४४० रुपयांचा आरएमडी पानमसाला ४८ पॅकेट, ७२ हजार रुपयांचा हिरा पान मसाला महापंक ६०० पॅकेट, ९ हजार रुपयांचा रोयाल ७१७ तंबाखु महापक ३०० पॅकेट, ४४ हजार रुपयांचा व्ही १ तंबाखू किंग पैक ४४०पैकेट, ७ लाख रु. अशोक लेलंड जीतो (एम एच १४ जीडी ७६२०) व टाटा एसीई झीप पांढ-या रंगाचा (एमएच १७ बीडी ६०२९) ही दोन वाहने असा एकूण १७ लाख १४ हजार ५१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुद्देमालासह आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे अहमदनगर येथे गुर नं PR भादवि कलम ३२८,२७२, २७३,१८८, सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d), २७(३)(c), ३०(२)(a), कलम ३(१)(zz.) (i) कलम ३ (१) (zz) (v) चे उल्लंघन करुन कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास हा कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे हे करीत आहेत.