अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्ह्यात ६१.९५ टक्के मतदान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या दरम्यान ५.३२ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात ६१.९५ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून मतदानाची टक्केवारी याप्रमाणे शेवगाव ५६.५, अहमदनगर शहर ५६.४३, राहुरी ६१.४, शिर्डी ६४.७७, पारनेर ६१.१९, नेवासा ७०.४९, कर्जत-जामखेड ६६.५, कोपरगाव ६५.८, श्रीरामपूर ५८.४२, श्रीगोंदा ५५.४८, संगमनेर ६४.१३, अकोला ६६.१६ टक्के मतदान झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आली होती. शहरी भागातील सर्व मतदान केंद्रातून मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात आली होती. त्यानुसार २ हजार ८५ मतदान केंद्रांवर ही सुविधा करण्यात आली.