अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच सर्च मोहिम : जिल्ह्यातील सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी दरोडयातील 3 आरोपी महिन्यानंतर जेरबंद ; घरफोडीचे गुन्हे उघडकीस
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्ह्यातील सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी दरोडयातील 3 आरोपी महिन्यानंतर पकडण्यात आले असून, आरोपीकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला यश आले आहे. पवन राजु भोसले, (रा.कोपरगाव, जि.अहिल्यानगर), देविदास जैनु काळे, (रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), सिध्देश सादिश काळे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२५ जानेवारी २०२५ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून आईस मारहाण केली. घरातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व दुचाकी जबरीने चोरून नेली, या योगेश खंडू शेरकर (रा.सोबलेवाडी, पठार वस्ती, ता.पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाणे गु.र.नं. ६३/२०२५ बीएनएस कलम ३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचच्या तपासी टीमकडून गुन्हयांत यापूर्वी सिध्देश सादीश काळे (वय २२, रा.वाळुंज पारगाव, ता.अहिल्यानगर), श्रीहरी हरदास चव्हाण (वय २५, रा.वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर) असे आरोपी मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले होते. गुन्ह्यातील इतर आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार झाले होते.
एसपी राकेश ओला यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचे पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन, कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने पोनि श्री. आहेर यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, हृदय घोडके, भाऊसाहेब काळे, बाळसाहेब खेडकर, अमोल कोतकर, आकाश काळे, फुरकान शेख व मेघराज कोल्हे अशाची टीम तयार करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची शोध घेणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.
दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पारनेर पोलीस ठाणे गुरनं ६३/२०२५ मधील निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना नागेश विक्रम भोसले (वय २०, रा.घोसपुरी, ता.अहिल्यानगर), पवन राजू भोसले (वय १८, रा.कोपरगाव, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर), देविदास जैनु काळे, (रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), ऋतीक पैदास चव्हाण (वय २१, रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर) व उमेश रवी भोसले (वय १८, रा.नक्शीनगर, कोपरगाव, ता.कोपरगाव) असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपी नागेश विक्रम भोसले यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा हा तो तसेच पवन राजू भोसले ( रा.कोपरगाव, जि.अहिल्यानगर), देविदास जैनु काळे (रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), सिध्देश सादिश काळे, फरारी अजय सादिश काळे, धीरज सादिश काळे, (दोघे रा. रा.वाळुंज पारगाव, ता.अहिल्यानगर), गणेश सुरेश भोसले (रा.पारगाव, ता.आष्टी, जि.बीड), श्रीहरी हरीदास चव्हाण, (रा.वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर), बाळु झारू भोसले (रा.जलसेनपिंप्री, ता.पारनेर), आवडया सुभाष उर्फ ठुब्या भोसले (रा.मौजे, ता.पारनेर) यांच्यासह केला असल्याची माहिती सांगितली. तसेच त्याने सांगितलेल्या माहितीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुरनं १८/२०२५, सुपा पोलीस स्टेशन गुरनं १७/२०२५, बेलवंडी पोलीस ठाण्यात गुरनं २७/२०२५, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं ०८/२०२५ व नारायणगाव पोलीस ठाणे (जि.पुणे) गुरनं ३१)२०२५, बीएनएस कलम ३०९(४),३(५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यातील आरोपी नागेश विक्रम भोसले, पवन राजू भोसले व देविदास जैनु काळे यांना गुन्हयातील चोरी केलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल सर्वानी आपसामध्ये वाटून घेतला. व त्यांच्या वाटयाला आलेले सोने हे सारोळा येथील सोनार पवन राजेंद्र बाफना यास विकले असल्याची माहिती दिली.
क्राईम ब्रॅंचच्या टीमने केलेल्या समांतर तपासात आरोपी नागेश विक्रम भोसले हा व सोबत ऋतीक पैदास चव्हाण (वय २१, रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), उमेश रवी भोसले, (वय १८, रा.नक्शीनगर, कोपरगाव, ता.कोपरगाव), पवन राजू भोसले (रा.कोपरगाव, जि.अहिल्यानगर) अशांनी मागील १५ ते २० दिवसापुर्वी शिरापूर (ता.पारनेर) येथे रात्री घरफोडी चोरी केली असल्याचे दिलेल्या माहितीवरून पारनेर पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी करून पारनेर पोलीस ठाणे गुरनं ६६/२०२५ बीएनएच कलम ३०५,३२४(४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आले आहेत.
ताब्यातील नागेश विक्रम भोसले (वय २०, रा.घोसपुरी, ता.अहिल्यानगर), पवन राजु भोसले (वय १८, रा.कोपरगाव, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर), देविदास जैनु काळे, (रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर) अशांना पारनेर पोलीस ठाण्यात गुरनं ६३/२०२५ या गुन्हयात व आरोपी ऋतीक पैदास चव्हाण (वय २१, रा.बिलोणी, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), उमेश रवी भोसले (वय १८, रा.नक्शीनगर, कोपरगाव, ता.कोपरगाव) यांना पारनेर पोलीस ठाण्यात गुरनं ६६/२०२५ या गुन्हयाचे तपासकामी पारनेर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
एसपी राकेश ओला, अहिल्यानगर अपर पोलीस अधिक्षक
प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने कारवाई केली आहे.