अहिल्यानगरात मद्यधुंद चालकाने अनेकांना ठोकले ; एकाचा मृत्यू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : शहरातील मार्केटयार्ड जवळील महात्मा फुले चौकात मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवताना गाडीचा ताबा सुटल्याने पायी जाणा-या व दुचाकीस्वारांना उडवून देण्याची घटना सोमवारी (दि.२५ नोव्हेंबर २०२५) ला सायंकाळी घडली. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, यातील एक जखमीला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेतील मृत्यू झाल्याचे नाव रविंद्र कानडे असे त्यांचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर याबाबत स्थानिक नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती आमदार संग्रामभैय्या जगताप यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. आमदार संग्रामभैय्या जगतापांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि श्री दराडे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मद्यधुंद चालकावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सांगितले.