संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नव्याने नियुक्त झालेले अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांनी गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकारला आहे.
अहमदनगर शहराचे तत्कालीन शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची बदली झाली. यानंतर त्या रिक्त जागी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके या दोन्ही अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले गेले.परंतु आता अहमदनगर शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी पूर्ण वेळ शहर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कातकाडे हे मिळाले आहेत. पण नगर शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत वाढते अवैध धंद्यांसह वाढत्या गुन्हेगारीवर करडी नजर श्री कातकाडे यांना ठेवावी लागेल.