अहमदनगर येथे ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर येथे ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : येथील जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ३२ राज्यांचे संघ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ४५० खेळाडू , संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, १०० पंच पदाधिकारी, १५० स्वयंसेवक, राज्य प्रतिनिधी व इतर असे एकूण ७०० जण सहभागी होणार आहेत. या सर्वांची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगर कबड्डी असोसिएशनचे शशिकांत गाडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह असो.चे पदाधिकारी उपस्थित होते.
जानेवारी २०२३ पासून म.रा.क.अ. च्या माध्यमातून अखिल भारतीय कबड्डी महासंघाकडे ७० व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष या स्पर्धेची मागणी करत होतो. सततच्या पाठपुराव्यामुळे ३० सप्टेंबर २०२३ रोजी स्पर्धा महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेला देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दि.९ जानेवारी २०२४ रोजी स्पर्धेचा कालावधी व स्पर्धा कार्यक्रमाचे पत्र जिल्हा संघटनेला अधिकृतपणे प्राप्त झाले.
यामुळे स्पर्धेचे नियोजन केले. यात दि.२० मार्च २०२४ संघ आगमन, नोंदणी होणार आहे. दि.२१ मार्च २०२४ रोजी दुपारी ४ वाजता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.‌ दि.२२ मार्च २०२४ ला‌ साखळी सामने सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत. दि.२३ मार्चला बाद पद्धतीचे सामने (उप उपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व) सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत, दि.२४ मार्चला उपांत्य फेरी व अंतिम फेरी व सायंकाळी ५ वा ते रात्री ८ वा. पारितोषिक वितरण होईल. यानंतर विजयी संघ दि.२५ मार्चला रवाना होणार आहेत, असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्पर्धेतून निवडलेला भारतीय कबड्डी संघ पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेत अनेक नामवंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तसेच प्रो कबड्डी मधील खेळाडू आपापल्या राज्यांतर्फे सहभागी होणार आहेत. या उच्च दर्जाच्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघण्याची सुवर्ण संधी नगरकरांना व होतकरू खेळाडूंना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेचा आवाका बघता खर्च ही मोठा येणार आहे. त्याची तरतूद करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर क्रीडा प्रेमी व दानशूर व्यक्ती सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!