संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- आघाडीच्या वतीने अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे याचा सोमवारी (दि.२८) अर्ज दाखल करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने महापौर व उपमहापौरपदासाठी दि.30 निवडणूक होणार आहे.
यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नेते तथा जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख गिरीष जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, राष्ट्रवादीचे गणेश भोसले, कुमार वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, विनित पाऊलबुध्दे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, माजी शहर प्रमुख संभाजी कदम,नगरसेवक अशोक बडे, योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे, अशोक दहिफळे आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस नगरसेवक, व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.