👉शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा – सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही धक्काबुक्की
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेचा महापौर होणार असला तरी, त्यापूर्वीच शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारास चांगलाच राडा झाला आहे. हा राडा महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवाण-घेवाणवरून झाला असून हा वाद कोतवाली पोलिस ठाण्यात गेला.
शिवसेनेच्या नगरसेविका रिता भाकरे यांचे पती शैलेश भाकरे यांना जमवाकडून मारहाण करण्यात आली. यात सेनेच्या माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे यांनाही मारहाण झाली आहे.नगरसेवक अनिल शिंदे आणि शैलेश भाकरे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतरच काहीवेळेनंतर मोठा राडा झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही जमवाकडून धक्काबुक्की झाली. शेवटी हा वाद थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गेला.महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरलेल्या आर्थिक देवाण-घेवाणवरून हा राडा झाला असल्याची चर्चा सुरू होती.
या घडामोडीमागे भविष्याच्या राजकारणाची नोंदी असून, काही दुस-या पक्षाची अन्यजण स्वतःच्या मतलबी राजकारणासाठी ही मंडळी शिवसेनेत भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत, अशीही दुसरीकडे नगर शहरात चर्चा सुरू झाली आहे.