अहमदनगर पोलीस प्रशासनात बदल्या ; जिल्ह्यात १६ नवीन अधिकारी

अहमदनगर पोलीस दलात बदल्या, जिल्ह्यात 16 अधिकारी नव्याने बदलून आले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या ४१ पोलीस अधिकार्‍यांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि.१९) काढण्यात आले. नगर जिल्ह्यातील २० पोलीस अधिकारी बाहेरच्या जिल्ह्यात बदलून गेले असून एका सहायक पोलीस निरीक्षकाला नगर जिल्ह्यातच अकार्यकारी पदावर मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात १६ अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.
येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली असून जळगाव येथून पोलीस निरीक्षक किरण शिंदे नगर जिल्ह्यात आले आहे. नगर जिल्ह्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक (कंसात बदली झालेला जिल्हा)- रवींद्र पिंगळे (जळगाव), विश्वास पावरा (नंदुरबार), हेमंत भंगाळे (नाशिक ग्रामीण), विवेक पवार (मुदत वाढ), संभाजी पाटील (नाशिक ग्रामीण), नितीन रणदिवे (जळगाव), प्रमोद वाघ (जळगाव), मयूर भांबरे (धुळे), सागर काळे (नाशिक ग्रामीण), अनिल बागुल (धुळे ), गौतम तायडे (नाशिक ग्रामीण). तसेच नगर जिल्ह्यात युवराज आठरे, सोमनाथ दिवटे, कुणाल सपकाळे, उज्वलसिंह राजपूत, संदीप हजारे, धरमसिंग सुंदरडे, किशोर पवार, हरीष भोये, गणेश अहिरे, संदीप परदेशी, अमोल पवार हे सहायक पोलीस निरीक्षक बदलून आले आहे.
तर पोलीस उपनिरीक्षक (कंसात बदली झालेला जिल्हा)-समाधान सोळुंके (धुळे), मनोज महाजन (जळगाव), सोपान गोरे (जळगाव), निकिता महाले (धुळे), समाधान भाटेवाल (धुळे), निरंजन बोकील (जळगाव), संतोष पगारे (नंदुरबार), राहुल सानप (जळगाव), अतुल बोरसे (नाशिक ग्रामीण). तसेच नगर जिल्ह्यात विनोद खांडबहाले, संदीप मुरकुटे, रोशन निकम, प्रवीण महाले हे पोलीस उपनिरीक्षक बदलून आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!