अहमदनगर जिल्ह्यात सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण हे  जिल्हा परिषद, अहमदनगर आरोग्य विभाग तसेच राहुरी कै. डॉ. बाबुराव दादा सेवाभावी संस्था यांना संस्थेमार्फत वितरीत करण्यात आले.
सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय संस्था ही जगभरात १२० देशात, भारतामध्ये एकूण 19 राज्यात बालकांच्या हक्क व अधिकारावर व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. कोविड १९ परिस्थितीमध्ये भारत देशामधील परिस्थितीत सुधारणा व्हावी. भारतीय नागरिकांचे जनतेची कोरोना महामारीतुन लवकरात लवकर सुटका व्हावी. तसेच देशाच्या आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण कमी होणे कामी संस्थेमार्फत देशातील विविध ठिकाणी यांत्रिक उपकरणे वाटपाचे कार्य हाती घेण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया व आता बेंगलोर मधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागविण्यात आले होते. ते सर्व  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई व पुणे विमानतळावरून देशातील विविध राज्यात यापूर्वी एकूण ३९ शहरात पोहविण्यासाठी संस्थेचे काम केले. अहमदनगरमध्ये  दोन ठिकाणी अ.नगर व राहुरी येथे हे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद, अहमदनगरला 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते व सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक  हरिश वैदय व प्रकल्प समन्वयक  गणेश ताठे यांच्या मार्फत जि.प.  जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांच्या उपस्थित डॉ. दादासाहेब साळुंखे (जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी),  संदीप काळे (जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुरुष) व अर्जुन दळवी (जिल्हा कार्यक्रम सहाय्यक प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
राहुरी येथील 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  वितरण कार्यक्रम हा  मा.नगराध्यक्षा  डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते बालाजी मंदिर देवस्थान येथील कोविड केअर सेंटर, राहुरी येथे झाला. यावेळी राहुरी  ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. साळवे,  ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. साबळे, ताहाराबाद सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक हरिश वैद्य, दत्तात्रय कदम, राधाकृष्ण पा. जाधव तसेच काकडेसर इ. सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थित होते. 
हे सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऑस्ट्रेलिया तसेच बेगलोर वरून आपल्या देशात आणण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले. त्या सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व्यवस्थापिका  शिरीन मॅथ्यूव्ह मॅडम,  सहाय्यक व्यवस्थापिका अपर्णा जोशी, अमिताव बारीक, वाणिज्य समन्वयक मनोज गोयल व प्रशासन समन्वयक आरिफ हमाल यांचे सहकार्य व  योगदान लाभले आहे. अजुन ही खुप काही सहकार्य व मदत भारतातील विविध राज्यांना व महाराष्ट्रातील मनपा मुंबई, मनपा पुणे, मनपा पिंपरी चिंचवड, मनपा नाशिक व मालेगाव, जिल्हा परिषद नाशिक, अहमदनगर, पंचायत समिती सिन्नर, इगतपुरी तसेच महाराष्ट्रात संस्थेचे कार्य हे मुंबई, पुणे व नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संस्थेचे बालकांशी संबंधीत विविध प्रकल्प हे सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत या संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाला लागणारे यांत्रिक उपकरणे, औषधे, सर्जिक सामान तसेच कोरोना माहामारीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील  झोपडपट्टीतील व ग्रामीण भागात आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला अन्न धान्य वाटप, वैयक्तिक कौटुंबिक स्वच्छतेसाठी  किशोरवयीन मुली, गर्भवती माता, स्तनदा माता यांना स्वच्छता किट (हायजिन किट) वाटपाचे काम संस्थेचे मार्फत मागील वर्षी कोविड माहामारीमध्ये वाटप केले होते.   यावर्षी वाटपाचे कार्य संस्थेमार्फत चालू आहे. तसेच कोरोना माहामारीमुळे मुलाच्या शिक्षणात खंड पडलेला आहे परंतु बालके शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये, म्हणून संस्थेमार्फत संस्थेचे विविध प्रकल्प ज्या कार्यक्षेत्रात चालू आहे.  त्या कार्यक्षेत्रातील बालकांना संस्थेमार्फत एज्युकेशन किट लर्निंग कीट चे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. सद्या संस्थेचे हे सर्व कार्य डेप्युटी डायरेक्टर  संजय शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुदर्शन सूची यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य चालू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!