संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक उद्योग व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २० व्यक्तींना जिल्हा नियोजन समितीवर स्थान देण्यात आले आहे. यामध्ये शेवगांव- पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले तर पाथर्डी मधून केदारेश्वरचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा शेवगाव पंचायत समितीच्या माध्यमातून डॉ क्षितिज भैय्या घुले यांनी बळिराजा, अपंग व्यक्ती, असाहाय महिला, विद्यार्थी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा’ ची मोहीम, रस्ते, घरकुल, मंदिर, सौर दिवे, आदींच्या माध्यमातून म द त करू न आधार दिल्याने तर संघर्ष योद्धा बबनराव साखर ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यातील उस तोडणी कामगारांच्या प्रश्नासाठी मदत केल्याने त्यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल शेवगांव- पाथर्डी मतदारसंघातील नागरिकाकडून शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात येत आहेत.