संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच ( एफटीके ) द्वारे तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी दि.१ डिसेंबर ते दि.३१ डिसेंबर दरम्यान स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान दि. १ डिसेंबर ते दि.३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर अभियानात हर घर जल या मोबाईल ॲपद्वारे अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठा योजना , रेट्रो फिटिंगमधील पाणी पुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधी मधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षाका मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
FTK किटद्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी याबाबत गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांची नावे अपलोड करण्यात येणार आहे. स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सर्व पाणी नमुन्याची तपासणी करावी, रेट्रो फिटिंग, नवीन योजनातील स्त्रोतांची जिओ टॅगिंग ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता हे करणार आहेत.पाणी नमुन्याचे संकलन जल सुरक्षकांनी करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं./ पा.व स्व.) सुरेश शिंदे ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांनी केले आहे.