अ.नगर एलसीबी : मुकुंदनगरात ५ दुकानांतून ३ लाखांचे गोमांस जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 3 लाख ६ हजार रु. किंमतीचे १ हजार ५३० किलो गोमांस, मुकुंदनगर अहमदनगरमधील वेगवेगळया ५ दुकानामधून जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात विविध ठिकाणी छापा टाकून वसीम महंमद कुरेशी ( वय २५, रा.सदर बाजार भिंगार), रफीक कासम कुरेशी, (वय ५२, रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर), समीर शफीक कुरेशी ( वय २८, रा. सदर बाजार, भिंगार, अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. दुकानाचा मालक महंमद नूर कुरेशी ( रा. सदर बाजार भिंगार), इरशात शफीक कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर), शफीक नूर कुरेशी, रा. सदर बाजार, भिंगार, अहमदनगर) ही सर्व फरार आहेत. याचा पोलिस शोध घेत आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ विश्वास बेरड, पोना संतोष लोंढे, पोकॉ जालिंदर माने, सागर ससाणे, रोहित येमुल, रविंद्र घुंगासे, रणजित जाधव, मयुर गायकवाड व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने कारवाई केली आहे.
कोतवाली पोलिस ठाणे: २ सराईत गुन्हेगार कोतवाली पोलिसांकडून तडीपार, एका महिन्यात तिसरी कारवाई
Nagar Reporter
अहमदनगर : शहरातील संजयनगर काटवन खंडोबा व बुरुडगाव रोड परिसरात राहणारे व शहरात चो-या करून हत्यारे बाळगून करुन दहशत निर्माण करणारे विकास दिलीप खरपुडे ( वय २५, रा बुरुडगाव रोड, अहमदनगर), सुनिलसिंग जितसींग जुन्नी (वय २६, रा काटवन खंडोबा संजयनगर, अहमदनगर) यांना जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपारीचे आदेश पारित केले आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोकाॅ तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, मुकुंद दुधाळ, कवीता गडाख, ए पी इनामदार, पोकों सोमनाथ राऊत, पोकॉ अमोल गाढे, पोकों सुजय हिवाळे, पोकों सागर मिसाळ, पोको अतुल काजळे अभय कदम राहुल मासाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीसांनी दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांनी हद्दपार प्रस्तावांची चौकशी करून दोन्ही आरोपींना हद्दपार करण्याबाबत शिफारस केली होती त्यावरून सुनावणी घेऊन श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर यांनी सदर गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पोनि चंद्रशेखर यादव यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तात्काळ आरोपीना ताब्यात घेऊन त्याच्यावर आज दि २० एप्रिल २०२३ रोजी हद्दपारीची कारवाई केली आहे.
मारहाण करणाऱ्या चौघांना दोन वर्ष सक्तमजुरी
Nagar Reporter
अहमदनगर : जमिनीच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या चौघांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रूपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधील ए.ए. श्रीवलकर यांनी ठोठावली. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. अमित झिंजुर्डे यांनी काम पाहिले.
शेतकरी सुदाम कोंडिराम बोरुडे (रा. शिंगवे नाईक, ता. नगर) यांना जमिनीच्या वादातून ता.९ जून २०११ रोजी आरोपी राजेंद्र बबन बोरुडे (वय ५०), गोकुळ रामचंद्र बोरुडे (वय ४८), संतोष बबन बोरुडे (वय ४५), बाळासाहेब बबन बोरुडे (वय ४९, सर्व रा. शिंगवे नाईक) यांनी काठी, गजाने मारहाण केली होती. सुदाम बोरुडे हे बेशुद्ध पडले होते. त्यांचा हात फॅक्रर झाला होता. त्यांच्या भावाने त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून एम.आय. डी.सी. पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध जबर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक कोल्हे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी, साक्षीदार, उपचार करणारे डॉक्टर कळमकर, डॉ. भुजबळ, तपासी अधिकारी कोल्हे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
आरोपीच्या वतीने बचाव करण्यात आला की, दुचाकीवरून पडल्यामुळे हात फॅक्चर झाला. न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला. चौघांना दोषी धरून दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. ॲड. एस.ए. बाबर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.